नारायण दादा मुळे सर्व सामान्य कुटुंबातील मुले मोठ्या पदावर,मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांचे गौरवोद्गार,कृतज्ञता सोहळयात प्राचार्य मधुकर गायकवाड यांचा गौरव आ.चव्हाण, आ.काळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या निर्मिती सोबतच स्थापन झालेल्या खेड्यातील शाळांनी ग्राम विकासात मोठे योगदान दिले.स्व नारायण दादा काळदाते यांच्या मुळेच ग्रामीण भागातील कष्टकरी,बहुजन समाजा तील मुले मोठ्या पदावर पोहोचू शकली,असे गौरवोद्गार मा.कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी काढले माजी कुलगुरु, प्राचार्य मधुकरराव गायकवाड यांच्या वतीने रविवारी दि.५ आॕक्टोबर रोजी बनसारोळा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते.या कार्यक्रमास पदवीधर आमदार मा.सतीश चव्हाण,शिक्षक आमदार विक्रम काळे,माजी आ. वैजनाथ शिंदे यांच्यासह माजी कुलगुरु डॉ.एन. व्ही. कल्याणकर (गडचिरोली),डॉ.देवानंद शिंदे (कोल्हापूर),माजी बिसीयुडी संचालक डॉ. भागवतराव कटारे,प्र कूलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे,संचालक ज्ञानेश्वर काळदाते,बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.नरेंद्र काळे, अध्यक्ष भागवतराव गोरे,प्राचार्यडॉ.बाबासाहेब गोरे,अनिलपंत कुलकर्णी यांची मंचावर उपस्थिती होती. प्रारंभी संस्थेच्या वतीने मंगलाताई व प्राचार्य मधुकर गायकवाड यांचा पाहुण्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ.विजय फुलारी म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात नाव लौकिक मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणा सोबतच व्यावहारिकता, शहाणपणाची जोड असायला हवी.प्राचार्य मधुकर गायकवाड यांनी नारायण दादांचे समाज सेवेचे काम पुढे नेले.स्व. वसंतराव काळे यांची मोठे योगदान त्यांच्या जडण घडणीत आहे.गायकवाड सरांसारखाच सर्वांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे,असेही कुलगुरू डॉ.विजय फुलारी म्हणाले की, अन्न,वस्त्र,निवाराअन् शिक्षण या चारही गोष्टी देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,असे प्राचार्य मधुकरराव गायकवाड म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कार्यकारिणीसदस्य तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही प्राचार्य गायकवाड यांनी काम उत्तम काम केले,असे आ. सतीश चव्हाण म्हणाले. माती आणि माता यांचे ऋण फेडण्याचा उपक्रम म्हणजे हा कार्यक्रम आहे, असे आ.विक्रम काळे म्हणाले.कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका
डॉ.नरेंद्र काळे यांनी मांडली.ग्रामीण भागातील शाळा वाचवण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.नारायण दादा काळदाते आणि वसंतराव काळे यांच्यामुळे गायकवाड सरांसह मान्यवरांची जडणघडण झाल्याचा गौरवही डॉ. काळे यांनी केला.यावेळी डॉ.नयना गायकवाड,डॉ. वाल्मिक सरवदे,डॉ. देवानंद शिंदे,डॉ.एन.व्ही कल्याणकर,वैजनाथशिंदे, ज्ञानेश्वर काळदाते यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ.संजय शिंदे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले.डॉ.अनुजा जाधव, प्रा.दादासाहेब लोंढे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.सुषमा जाधव यांनी आभार मानले.प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत प्रा.निळकंठ, बाळासाहेब,विजय,उदय, अमोल सुध्दा व भगवान गायकवाड यांनी केले.
बनेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने मा.कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्याहस्ते मंगलाताई व प्राचार्य मधुकर गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आ.सतीश चव्हाण,आ.विक्रम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.