राजकीय

खा.रजनीताई पाटील यांच्या उपस्थितीत दैनिक लोकनायक चे व्यवस्थापक ॲड.अक्षय मुळे,बसपाचे बीड जिल्हाउपाध्यक्ष विशाल साबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे -खा.सौ. रजनीताई पाटील. खा.सौ.रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट

केज/प्रतिनिधी

केज शहरात झालेल्या भव्य कार्यक्रमात दैनिक लोकनायक चे व्यवस्थापक अॕड.अक्षय मुळे तसेच बहुजन समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साबळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण दिले.हा प्रवेश सोहळा खा.सौ. रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या राज्यसभा खा.सौ. रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेश सर चिटणीस श्री.आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे,प्रवीण भाऊ शेप,पशुपतीनाथ दांगट,बाळासाहेब ठोंबरे,मुन्ना ठोंबरे,गणेश बुजगुडे,युवककाँग्रेसचे प्रदेश सचिव आकाश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत दै. लोकनायक चे व्यवस्थापक ॲड.अक्षय मुळे,बसपाचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साबळे,संकेत साबळे, रवी साबळे,प्रवीण खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केज येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खा.सौ.रजनीताई पाटील म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा सामाजिक न्याय,समता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे.युवा व सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षावर वाढता विश्वास हीच खरी ताकद आहे. काँग्रेस पक्षाचे जनमानसामध्ये विश्वासार्हता आहे. सामान्य माणसाच्या हितासाठी लढणारा हा पक्ष आहे.काँग्रेसची विचारधारा ही सामान्यांच्या हिताची आहे.सर्व जाती,धर्म पंथाचा काँग्रेसवर विश्वास आहे.यामुळे पक्षाचा व्यापकता अजून वाढत आहे.

येणाऱ्या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढत आहे.जनता काँग्रेसच्या सोबत येणार आहे.या पुढील काळात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाहीचा विजय निश्चित होईल असे मत यावेळी खा.सौ.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केल.

 

पक्षाशी एकनिष्ठ असणारे नेतृत्व खा.सौ. रजनीताई पाटील आहेत.या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच बहुजन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल साबळे,दैनिक लोकनायक व्यवस्थापक ॲड.अक्षय मुळे यांनीकार्यकर्त्यांसह प्रवेश केला.काँग्रेस हा बहुजनवादी विचाराचा पक्ष आहे.खा.रजनीताई पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही प्रवेश केला असल्याचे ॲड.अक्षय मुळे यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये दाखल होताना अॕड.अक्षय मुळे यांनी सांगितले की,“दै. लोकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही सामाजिक प्रश्न मांडत आलो आहोत. आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे.”

हाताच्या पंजाकडे कार्यकर्त्यांचा ओढा –

राहुल सोनवणे

जिल्ह्यात द्वेषाचे गढूळ वातावरण साचले होते. त्यावेळी सद्भावना निर्माण व्हावी ही विश्वासाहर्ता काँग्रेसने जपल्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा काँग्रेसकडे येत आहे.

बसपाचे जिल्हाध्यक्ष विशाल साबळे यांनी आपल्या भाषणातव्यक्त केले की,“बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काँग्रेसने नेहमीच भरीव काम केले आहे.वंचित घटकांसाठी काँग्रेस हा आशेचा किरण आहे. त्यामुळेच आम्ही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.” यावेळी प्रवेश केलेल्या सर्वांचा सत्कार करून काँग्रेस पक्षात स्वागत केले.प्रवेश कार्यक्रमास कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!