राजकीयसामाजिक

काम करेल तोच पदावर राहणार,बीडमध्ये शिवसेनेचा निर्धार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक संपन्न

बीड/प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आज बीड येथे जिल्हा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. “तुम्ही शिवसेना बळकट करा,ताकद देण्याचे काम शिंदे साहेब करतील” असा आक्रमक संदेश यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आला.तसेच “काम करणार तोच पदावर राहणार”असा स्पष्ट इशारा देत संघटन वाढीवर भर देण्यात आला.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आणि सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री तथा मराठवाडा संपर्क प्रमुख ना.प्रकाश आबिटकर आणि विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

बूथ सक्षमीकरण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ स्तरापासून संघटन मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जनसंपर्क

प्रत्येक शिवसैनिकाने जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि प्रामाणिकपणे काम करावे,असेआवाहन करण्यात आले.

 ऊर्जा केंद्र

आगामी काळात बीड जिल्हा मराठवाड्यातील शिवसेनेचे मुख्य ‘ऊर्जा केंद्र’ बनेल,असा विश्वास ना.आबिटकर यांनी व्यक्त केला.

भगवा फडकवणार 

सर्वांच्या साथीने बीड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकवण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला .

मान्यवरांची उपस्थिती

या आढावा बैठकीस शिवसेनेच्या उपनेत्या संगीताताई ठोंबरे,अनिल जगताप,जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,स्वप्नील गलधर,चंद्रकांत नवले, महिला आघाडी मराठवाडा संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाणयांच्या सह शिवसेना,युवासेना, महिला आघाडी,शेतकरी सेना,शिक्षक सेना आणि ओबीसी-व्हीजेएनटी सेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक असून,कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ना.प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री तथा मराठवाडा संपर्कप्रमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!