
केज/प्रतिनिधी
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन भाजपाच्या महीला आघाडीच्या बीड जिल्हा उपाध्यक्षा सौ.उषाताई रमाकांत मुंडे यांनी दि.६ एप्रील सोमवार रोजी केज येथील लक्ष्मीनगर मधील आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमीत्त घरी झेंडा लावून स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने व भाजपा पक्षाच्या घोषणा बाजी व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.स्व.अटल बिहारी वाजपेयी यांनी ४१ वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती.
या भाजपा पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे असुन त्यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या भाजपा पक्षाची सत्ता ही केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यात सत्ता आल्याने भाजपा अध्यक्षांच्या व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून सर्वत्र भाजपा स्थापना दिवस साजरा करण्याचा आदेश येताच महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री मा.पंकजाताई मुंडे यांच्या विश्वासु बीडच्या भारतीय जनता पार्टीच्या महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. उषाताई रमाकांत मुंडे यांनी केज येथील लक्ष्मीनगर येथे काही आपल्या निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपा पक्षाचा स्थापना दिन साजरा करुन घरी झे॔डा लावून स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने व भाजपा पक्षाच्या घोषणा बाजी व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत (बापू) मुंडे, उद्योजक तथा देवगांव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुर भैय्या मुंडे,भागवत चिंचकर, अशोक सिरसट, शंकरनाईकनवरे,बालाजी बिक्कड यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



