वाणिज्य

बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने विमा धनादेश प्रदान 

केज/प्रतिनिधी

बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी शाखा केज शाखेच्या वतीने मयत कर्जदार सभासदाचे वारसास विमा धनादेश वितरण करण्यात आला. सहकाराची समृद्ध परंपरा जतन करण्याबरोबरच सहकाराला सामाजिक कार्याची जोड देऊन ग्राहक लघु उद्योजक व शेतकरी सभासदांच्या हितासाठी आर्थिक व सोशल बँकिंग राबविणारी व आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची संस्था म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या संस्थेच्या बीड विभागातील शाखा केजच्या वतीने मयत कर्जदाराच्या वारसास विमा धनादेशाचे वितरण करण्यात आले.

मु.धर्माळा पोस्ट लव्हूरी तालुका केज येथील रहिवासी व संस्थेचे सभासद गणेश अंकुश सोळुंके यांनी दिनांक 20/05/2024 व दि.11/06/2024 आणि  दि.01/08/2024  रोजी शाखा केज येथून सोनेतारण कर्ज रक्कम रुपये 109000/- घेतले होते.दरम्यान त्यांचा दिनांक 25/09/2024 रोजी विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

संस्थेच्या वतीने ठेविदाराला ठेवी रकमे एवढे व कर्जदारास कर्ज रकमे एवढे अपघातीविमा संरक्षण देण्यात येते सदर घटनेची माहिती मिळताच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राधेश्यामजी चांडक (भाईजी) संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.सुकेशजी झंवर सर व संस्थेचे सर व्यवस्थापक कैलासजी कासट सर यांच्या आदेशा नुसार तसेच बीड विभागा चे विभागीय व्यवस्थापक माधव मगर यांच्या मार्गदर्शना खाली शाखा व्यवस्थापक दिपक काळे यांनी सोळुंके परिवाराचे सांत्वन करून मयत सभासदाच्या वारसास लागू असलेल्या अपघाती विमा संबंधी सर्व माहिती दिली.

यावेळी सोळुंके परिवाराकडून आवश्यक ती सर्व कागदपत्राची पूर्तता करून विमा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर करण्यात आला.या योजनेअंतर्गत आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने मयत कर्जदार गणेश अंकुश सोळुंके यांच्या कर्जाच्या व्याजासह पूर्ण रकमेचा 115000/- चा क्लेम मंजूर करून आज दिनांक 15/10/2025 रोजी मयत खातेदार सभासद यांच्या वारसदार श्रीमती सोनाली गणेश सोळुंके यांना सोनेतारण कर्ज खात्यातील सोने चिज वस्तू श्री.माधव मगर विभागीय व्यवस्थापक बीड यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी केज शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. दिपक काळे व धारूर शाखेचे शाखाव्यवस्थापक श्री.बप्पासाहेब लांडे व ठेवीदार ग्राहक सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!