
केज/प्रतिनिधी
पुरवठा विभागा अंतर्गत येणारे केज शहरातील राशन दुकान नंबर १४ च्या काळ्या बाजाराबाबत शरद सूर्यकांत थोरात यांनी केज तहसीलदारांना १५/१०/२०२५ रोजी निवेदन सादर केलेले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की ,केज शहरातील फुलेनगर भागात असलेले राशन दुकान क्रमांक १४ चे मालक सुरेश तात्या पाटील हे असून सदरील दुकान चालवण्यासाठी त्यांनी सुभाष उर्फ सुबराव गालफाडे यांना दिले आहे.
सदरील राशनदुकान चालक हा केज तहसील कार्यालयात दलालीचे काम करत असल्याने त्याचे तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत सखोल्याचे सबंध आहेत.त्यामुळे त्याने फुले नगर केज राशन दुकानात काळाबाजार मांडला आहे.गोरगरीब लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा वापरून,काहीतरी कारण सांगून,तुमचा अंगठा लागत नाही.तुमचे राशन कमी झाले त्याच प्रमाणे तुमच्या राशन कार्ड कॅन्सल झाले आहे असे काहीही कारण सांगून लाभधारकांना राशन न देता माघारी पाठवले जात असल्याचे शरद थोरात यांचे म्हणणे आहे.अंगठा लागत नाही. अशाप्रकारे मनमानी कारभार चालू आहे. त्याच्या वेळेनुसारच तो दुकान चालू ठेवतो आणि बंद करतो.
शरद थोरात यांच्याकडे अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी आल्यामुळे सदरील राशन चालक सुभाष उर्फ सुबराव गालफाडेला शरद थोरात यांनी काळ्या बाजारात जाणारा माल अडवला असता सुभाष उर्फ सुंबरान गालफाडे यांनी विनंती केल्यामुळे, माफी मागितल्या मुळे मी त्यांना माफ केले परंतु यांची सवयी काही जात नसल्यामुळे,वारंवार आलेला माल हा काळ्या बाजारात,हॉटेल चालकांना तांदूळ 25 रुपये किलोने, गहू 30 रुपये या पद्धतीने विकला जातो.आणि आमच्या सारख्या लोकांना रिकाम्या हाताने माघारी पाठवतो.यामुळे सरकारी योजने पासून गोरगरीब जनता वंचित राहते.
शिधा देणे हे सरकारी लोकांचे काम असताना देखील त्याला बगल देऊन, कोणालाही न डगमगता हा खुलेआम काळाबाजार करत असल्यामुळे जनतेच्या म्हणण्यानुसार याच्यापासून हे दुकान काढून घेण्यात यावे, आणि योग्य माणसाला तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात यावे. त्याचप्रमाणे सदरील इसमावर योग्य गुन्हे दाखल करण्यात यावेत. सुभाष उर्फ सुबराव गालफाडे वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
तसेच हे दुकान तहसील मार्फत चालविण्यात यावे व गोरगरीब जनतेला अन्नधान्य मिळविण्या साठी सहकार्य करावे,अन्यथा लवकरात लवकर शरद थोरात हे आझाद क्रांती सेना तालुकाप्रमुख या नात्याने अन्नत्याग आंदोलन करणार असून जर त्यांच्या जीवास काय बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार साहेब, गोडाऊन कीपर वसदरील दुकानदार चालक यांची राहील.
त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आझाद क्रांती सेनेच्या वतीने केज तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शरद थोरात यांनी सांगितले.



