

केज/प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्था अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित बीड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण २०२६ इयत्ता दुसरी,तिसरी,चौथी व सहावी शिक्षकांचे प्रशिक्षण टीओटी मराठी व उर्दू माध्यम आज साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे दि.१७ जुन २०२६ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे.या प्रशिक्षणाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे सीईओ श्री.जितिन रहमान साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रशिक्षणास संबंध जिल्हाभरातून ४५० शिक्षक सहभागी झालेले आहेत.सदर प्रशिक्षण हे निवासी स्वरूपाचे असून सदर प्रशिक्षणात नवीन शिक्षण धोरण २०२० नुसार इयत्ता दुसरी, तिसरी,चौथी व सहावी चालू शैक्षणिक वर्षां पासून बदलेल्या अभ्यासक्रम यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी सीईओ श्री. जितीन रहेमान साहेब शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की,केवळ वेतनासाठी काम न करता आपण आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहा.आपल्या व्यवसायावर प्रेम करा.
तुमच्या हातात भारत देशाची पिढी घडवण्याचे कार्य आहे हे कार्य उत्कृष्ट रीतीने आपण पार पाडाल अशी मलाअपेक्षा आहे.दिवसेंदिवस खाजगी शाळांचा पट वाढत असून जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होत आहे याचे कारण जन्मदर, लोकसंख्या नियंत्रण आणि चांगले व अधिकचे मिळवण्याचा प्रयत्न यासाठी पालक सातत्याने प्रयत्न करत असतो.त्यामुळे आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी एक स्वतंत्र पुस्तक आहे आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज, आवडनिवड विचारात घेऊन शैक्षणिक कार्य करावे व आपल्या जिल्हा परिषद शाळांचा पट टिकवून ठेवावा. आपणास दिले जाणारे प्रशिक्षण व्यवस्थितरित्या आपण घेऊन ते विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न करावेत जेणे करून उद्याची पिढी सक्षम बनेल.तसेच यावेळी डाएट कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिल मुरकुटे सर यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई डाएटच्या वतीने दिले जाणारे प्रशिक्षण ही दर्जेदार दिली जातात.
यासाठी आमची संपूर्ण टीम कार्य करत असते.प्रशिक्षणा मध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची काळजी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सातत्याने घेत असते व प्रत्येक वर्षी अधिक दर्जेदार शिक्षक प्रशिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न करते. डायटच्या माध्यमातून राज्य स्तरावर पाठवले गेलेले प्रशिक्षणार्थी व जिल्हा स्तरावर निवडले गेलेले प्रशिक्षणार्थी हे दर्जेदारच निवडले गेलेले आहेत.जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेऊन तालुका स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीने सुलभक प्रशिक्षण देण्याचे काम करतील अशी मला अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायटचे अधिव्याख्याता डॉ.राजेश गोरे सर यांनी केले.
सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केले तर आभार डॉ.कविता गित्ते मॅडम यांनी मांडले.या उद्घाटनप्रसंगी गटशिक्षण अधिकारी श्री.सुनील केंद्रे साहेब,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे सर,ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. भागीरथी गिरी मॅडम, ऊसतोड कामगार विकास मंडळ संस्थेचे संस्था अध्यक्ष अँड. उद्धवराव कराड सर उपस्थित होते.यावेळी राज्यस्तरावर प्रशिक्षण घेतलेले २० सुलभक व संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.



