

धारूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,मा.जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड,यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर येथे नागरी सहकारी बँका,पतसंस्था करिता दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासूतज्ञ, व्याख्याते श्री.खोडसे सी.ए. प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांनी नियामकमंडळाच्या नियमानुसार ठेवीचे व्याजदर,कायदेशीर कर्ज वाटप व बंधने,कर्ज वसुली संदर्भात १०१ कायदेशीर प्रकरणे,कर्ज वाटप करत असताना घ्यावयाची वैधानिक दक्षता,भविष्यात संस्था अडचणीत येणार नाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.दुसऱ्या सत्रामध्ये मा.सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस.आर. कोळे यांनी सहकार कायदा,नियम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
तसेच सहाय्यक निबंधक सहकार अधिकारी श्रीमती ऋतुजा ठोके मॅडम यांनी नागरी व ग्रामीण पतसंस्थांनी नियामक मंडळाच्या परिपत्रकानुसार कामकाज करण्यात यावे,कायदा व नियम यांचे उल्लंघन न करता संचालक मंडळांनी कामकाज करण्यात यावे व येणाऱ्या काळात आपल्या सहकार क्षेत्रात आपली संस्था कशी उंचावेल याकडे लक्ष केंद्रित करावे व तसेच वेळोवेळी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले.या दोन दिवसीय प्रशिक्षणात उपस्थित सर्व कर्मचारी वृंद यांचे आभार श्रीमती दामिनी चिंचाळकरमॅडम यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन आभार वर्ग संयोजक एस.आर.कोळी यांनी केले.



