
केज/प्रतिनिधी
केज विधानसभा व परळी विधानसभेतील महिला सेनेचा संवाद मेळावा खासदार ज्योतीताई वाघमारे, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी,उपनेत्या कला ताई शिंदे, विजयाताई पोटे,मा.आ.संगीताताई ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल पियुष इन अंबेजोगाई येथे पार पडला. यावेळी खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी प्रत्येक शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला व मोलाचे मार्गदर्शन केले
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, महिला संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाण, महिला जिल्हाप्रमुख डॉ. प्रतिभाताई थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष आम्रपालीताई गजेशीव, परळी विधानसभा उप जिल्हाप्रमुख कल्याणी ताई औटी,केज अंबेजोगाई विधानसभा उपजिल्हाप्रमुख मीराताई आडे,उपजिल्हा प्रमुख फरजानाताई शेख,माजी उपसभापती सरोजनीताई ससाणे, आंबेजोगाई तालुका प्रमुख सुनीताताई जाधव, परळी तालुकाप्रमुख यशोदाताई राठोड, परळी शहर प्रमुख सविताताई लिखे, अंबेजोगाई शहर प्रमुख तनुजाताई मुंडे, शिवकन्याताई काकडे, गणोरकरताई यांच्यासह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार ज्योती ताई वाघमारे यांच्या भाषणाने महिला शिवसेना पदाधिकारी यांच्यातील उत्साह शिगेला पोंहोचला होता.



