केजमध्ये एफडीएची मोठी कारवाई, ६.६८ लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्त;भेसळ बाजांचे धाबे दणाणले!

केज/प्रतिनिधी
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासन एफडीए विभागाने केज शहरात एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे.शहरातील एका मिठाई उत्पादन युनिटवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ६ लाख ६८ हजार ४०९ रुपयांचा संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
अस्वच्छतेचे साम्राज्य आणि संशयास्पद साठवणूक
अन्न व औषधप्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री.तुकाराम मुंडे यांनी १७ जून रोजी बीड शहरातील एका नामांकित मिठाईनिर्मिती कारखान्याची अचानक तपासणी केली.या तपासणी दरम्यान मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि मानवी आरोग्याला गंभीर अपाय ठरेल अशा भयानक परिस्थितीत साठवून ठेवल्याचे उघडकीस आले.उत्पादन प्रक्रिया आणि साठवणुकीच्या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या अन्नपदार्थांचे नमुने जप्त
कारवाईदरम्यान पथकाने कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त केला.यामध्ये प्रामुख्याने खालील पदार्थांचा समावेश आहे. लिक्विड ग्लुकोज,खुला खवा(मावा), वनस्पतीतूप (सूर्या गोल्ड),प्रीमियम गोल्ड हलवा (व्हाईट आणि ब्राऊन), इंडियन स्वीट ट्रेडिशनल फूडस्वीट प्रयोगशाळेच्या अहवालानंतर होणार कठोर कारवाई जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने तातडीने रासायनिक तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत.हा प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार (फसाई) थेट फौजदारी किंवा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाचा कडक इशारा
ही धडक कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या थेट मार्गदर्शना खाली अन्न सुरक्षा विभागाच्या विशेष पथकाने पार पाडली. सणासुदीच्या दिवसांत मिठाईला वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांची फसवणूक आणि आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.शहरात ही मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर प्रशासनाचा करडा बडगा कायम राहील,असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.



