सामाजिक

बनसारोळा केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारासाठी स्वयंपाकी व मदतनीस पदाची निवड स्वयंपाकी सौ.नंदिनी रमेश सोनके तर मदतनीस पदी रमेश गोविंद सोनके यांची निवड 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बनसारोळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजनेसाठी स्वयंपाकी व मदतनीस पदांच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली.यामध्ये स्वयंपाकी म्हणून नंदिनी रमेश सोनके तर मदतनीस म्हणून रमेश गोविंद सोनके यांची निवड करण्यात आली.

सदरील निवड प्रक्रिया शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अरविंद महादेव गोरे तसेच समिती सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. निवड झालेल्या उमेदवारांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळा साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काकडे,मठपती सर, मस्के सर,पाटील सर, स्वामी मॅडम,अंजान मॅडम आणि नरवडे मॅडम यांनी निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी नव्याने निवड झालेल्या स्वयंपाकी व मदतनीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!