जीवन शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय केजचा दहावी व बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के


केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.माध्यमिक शालांत परीक्षेत अपर्णा भारत मदने हिने 93.20 % गुण मिळवून प्रथम, कु.विद्या मेघराज घुले हिने 92.80% गुणांसह द्वितीय तर चि.प्रसाद बाळासाहेब थोरात याने 92.00% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. कु. राऊत अमृता अभिमान हिने 91.80%,कु.श्रुती रवींद्र घुले हिने 90.60% गुण मिळवले.39विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.प्रथमश्रेणीत 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत कु.माचवे धनश्री संतोष हिने 78% गुणां सह प्रथम,चि.दराडे अशोक बाळू याने 77.67% गुणांसह द्वितीय तर कुमारी राऊत लक्ष्मी अंकुश हिने 74.33 % गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
दोन विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.संस्थेचे सचिव हारुणभाई इनामदार साहेब,संस्था सदस्य यासीन भाई इनामदार, जीशान इनामदार प्राचार्य श्री.दत्तात्रय हंडीबाग सर, मुख्याध्यापक श्री. रमाकांत ढाकणे सर, बारावी विज्ञान शाखा प्रमुख श्री हावळे सर, वस्तीगृह विभाग प्रमुख श्री.शिंदे सर,बीएससी विभाग प्रमुख श्री.साखरे सर,बंसल क्लासेसचे प्रमुख गोविंद ठोंबरे सर व सर्व कर्मचारीवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


