सामाजिक

प्रा.बबनराव आंधळे यांना पद्मपाणी राज्य स्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०२६ जाहीर

बीड/प्रतिनिधी

पद्मपाणि राज्यस्तरीय सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०२६ ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक बबनराव आंधळे यांना जाहीर झाला आहे.रविवार दि. १७ मे रोजी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्यनिस्वार्थ सेवा आहे सामाजिक प्रश्नावर सातत्याने घेतलेली भूमिका तसेच जनसामान्याच्या अडी अडचणी सोडविण्या साठी केलेल्या संघर्षाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी विविध आंदोलने ओबीसी साठी लढा विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ते सोडवण्याचा प्रयत्न शेतकरी संघर्ष समिती च्या माध्यमातून बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलन मोर्चा इत्यादी च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत सामाजिक बांधिलकी जपत शिक्षकासाठी त्यांनी भीक मांगो आंदोलनात ही सक्रिय सहभाग नोंदवला गावामध्ये गेली २५ वर्षापासून ते ग्रामपंचायतचे सदस्य आहेत गावांमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुलगी जन्मल्यानंतर तिच्या नावाने ते दहा हजार रुपयाची एफ डी करतात असे विविध उपक्रम ते सतत राबवत असतात त्यांच्या या धाडसी आणि जनहिताच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होत असून अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहे.

संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान बार्शी रोड बीड या ठिकाणी डॉ.संजय तांदळे यांच्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रक्रिया देताना त्यांनी सांगितले की,समाजासाठी केलेल्या कामाची खरी पावती आज मला मिळाली आहे समाजा कडून मिळणारा सन्मान हा खूप मोठा असतो. मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमान तर आहेच परंतु या समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा एक आदर्श ठरणार आहे हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे यासाठी पद्मपाणि प्रतिष्ठानच्या आयोजक व संपूर्ण टीमचे मी मनःपूर्वक आभार मानतो हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्राध्यापक बबनराव आंधळे यांचे सर्व जिल्ह्यांमधून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!