केज/प्रतिनिधी
दि.३१ मे २०२६ रविवार रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता. केज या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले व अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी येथे झाला.आईचे नाव सुशिलाबाई व वडील माणकोजी शिंदे हे असुन पतीचे नाव खंडेराव असुन त्या माळव्यात तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात.त्या स्वतःसैन्याचे नेतृत्व करत होत्या तसेच त्या उचित न्यायदान करत असत.
अशा या शुर वीर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याबद्दल माहिती आपल्या प्रास्ताविकात या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितली. यावेळी श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज,डॉ.श्री. रामकिशन ग्यानबा मुळे सर,श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे सर,श्री.राहुल बजरंग बचुटे सर व विद्यार्थी उपस्थित होते.



