एकुरका येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवपुराण कथेला सुरुवात,भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील एकुरका येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवपुराण कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहाचे हे ३७ वे वर्ष असून ज्ञानेशभक्त, व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या प्रेरणेने ही धार्मिक परंपरा अखंड पणे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शुक्रवार,दि.२४ पासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवार,दि.१ मे रोजी होणार आहे. या कालावधीत दररोज काकडा,विष्णूसहस्त्र नाम,गाथा भजन, शिवपुराण कथा,हरिपाठ तसेच कीर्तन अशा विविध धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिवपुराण कथेसाठी ह.भ.प.प्रल्हाद महाराज शास्त्री हे कथा प्रवक्ते म्हणून उपस्थित असून,सप्ताहात सलग सात दिवस विविध मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकारांचा सहभाग राहणार आहे.
यामध्ये ह.भ.प.प्रभु महाराज मुंडे (गंगाखेडकर),जालना जिल्हा शिक्षण अधिकारी ह.भ.प.विक्रम महाराज सारूक , ह.भ.प.प्रल्हाद महाराज शास्त्री,ह.भ.प. विलास महाराज गेंगजे, ह.भ.प.सुदर्शन महाराज शास्त्री ,ह.भ. प. प्रकाश महाराज साठे यांचा समावेश आहे.सप्ताहाची सांगता व्याकरणाचार्य ज्ञानेशभक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तरी भावीक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.



