अध्यात्मिकसामाजिक

श्री क्षेत्र पावनधाम औरंगपूर येथे १४ जून रोजी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काला किर्तन व धोंडे भोजन सोहळ्याचे आयोजन

केज/प्रतिनिधी

प्रति देहू श्रीक्षेत्र पावनधाम,औरंगपूर ता. केज,जि.बीड येथील श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थानच्या वतीने अधिकमास (पुरुषोत्तममास) निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त काल्याचे किर्तन व धोंडे भोजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार,दिनांक १४ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. पंचक्रोशीतील भाविकां साठी हा एक सुवर्णयोग चालून आला आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चालू असुन या सोहळ्या निमित्त सकाळी १०-०० ते १२-०० या वेळेत काल्याचे कीर्तन,संत पूजन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

जगद्गुरु तुकोबारायांचे ११ वे वंशज कीर्तनकार श्रीगुरु ह.भ.प.पुंडलिक महाराज देहूकर यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.हा संपूर्ण सोहळा सर्व संत वंशजांच्या आणि महाराज मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.प्रमुख मार्गदर्शक आणि यजमान यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक व अध्यक्ष गुरुवर्य महंत ह.भ.प.श्री.महादेव महाराज बोराडे शास्त्री हे आहेत.

या कार्यक्रमाचे यजमानपद खालील मान्यवर भूषवित आहेत: श्री.नामदेव इंदरराव गोरे, श्री.प्रकाश भानुदासराव करपे, श्री.भास्कर नागोराव आगळे,श्री. अनिल लक्ष्मणराव पिंपळे, श्री.सतीश पंढरीनाथ शिंदे हे आहेत तरी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान, औरंगपूर,ता.केज,जि. बीड या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या भक्तीमय सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी केज तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थान व यजमान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!