गुन्हेगारी

जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी, दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गून्हा दाखल 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार चालू आहेत. दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,जीवाचीवाडी येथील दैवशाला उमेश सारुक या घरी आसताना त्यांचे पती व जाऊ हे त्यांच्या घराच्या मागील शेतात पाईप लाईन जोडीत होते यावेळी शहादेव सारुक, महादेव सारुक,व ज्ञानेश्वर सारुक या तिघांनी घरी जाऊन दैवशाला उमेश सारुक त्यांच्याशी गैरवर्तन करून वाईट हेतूने त्यांच्या हाताला धरून त्यांना घरात ओढून नेत असताना त्यांनी आरडा ओरडा केल्यामुळे त्यांचा नवरा व जाऊ धावत आले असता तिघेही पळून गेले.दरम्यान थोड्याच वेळात आरोपीतानी संगनमत करून लाथा बुक्क्याने, व काठीने केलेल्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून शहादेव तुकाराम सारुक, महादेव तुकाराम सारुक, ज्ञानेश्वर महादेव सारुक, चंद्रकला शहादेव सारुक, धुराबाई तुकाराम सारूक प्रयागाबाई महादेव सारुक,सचिन महादेव सारूक,राजा शहादेव सारुक,पूजा महादेव सारुक,आणि तुकाराम आप्पाराव सारुक अशा एकूण दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला असून, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार पुरुषोत्तम शेप हे पुढील तपास करीत आहेत

चौघे गंभीर जखमी…

या मारहाणीत नंदुबाई भिकाराम सारुक, दैवशाला उमेश सारुक, एक बारा वर्षाच्या मुला सह चौघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!