सामाजिक

केज शहरातील फुले नगर भागातील मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दिर्घ आजाराने निधन; 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील फुले नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या स्व.मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.त्या आकाश लोंढे व विलास लोंढे सर यांच्या मातोश्री होत्या.  दि.२५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने लोंढे परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे.

सोमवार रोजी सकाळी क्रांती नगर,केज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,प्रतिष्ठित नागरिक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व.मंडुबाई लोंढे यांच्या पश्चात मुले,सुना,मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!