गुन्हेगारीसामाजिक

धर्मापुरीत गांजाची विक्री करणाऱ्यावर एलसीबी चा छापा ;९.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त 

परळी/प्रतिनिधी

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या आरोपींना पकडले. दिनांक ११ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बंटेवाड यांना गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की,बाबुलाल उर्फ बबलु आतार हा त्याच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि धनराज जारवाल यांच्या पथकाने तसेच परळी ग्रामीण पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां सह धर्मापुरी येथील संबंधित ठिकाणी छापा टाकला.यावेळी घरातून २० किलो ३४० ग्रॅम गांजा व विक्रीसाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण ९ लाख ७७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शेख बाबुलाल अतार व वसीम बाबुलाल अतार दोन्ही रा.धर्मापुरी,ता.परळी, जि.बीड यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ अन्वये कलम २०,२९ एनडीपीएस कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभाग अंबाजोगाई तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल, पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते, भागवत शेलार,दीपक खांडेकर,महिला पोलीस स्वाती मुंडे,चालक हराळे तसेच परळी ग्रामीण पोलिसांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!