सामाजिक
धनेगाव येथील रहिवासी आत्मलिंग गुजर यांची आत्महत्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी आत्मलिंग नामदेव गुजर वय ४४ वर्षे यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मांजरा धरण क्षेत्राच्या डाव्या कालव्याच्या लोखंडी रॅम्पला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून त्यांच्या पार्थिवाची युसूफ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यानंतर रविवारी दुपारीं दिड वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्च्यात २ मुली,आई, वडील,पत्नी असा परिवार आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.



