
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व श्री नृसिंह जयंती ग्रंथवाचन, व्याख्यान, परिसंवाद कार्यक्रम घेवून संपन्न झाली.दिनांक २३ एपिल २०२६ रोजी जागतिक पुस्तक दिन पुस्तकवाचन व चर्चासत्र कार्यक्रम घेवून संपन्न झाला.
दि.३० एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व श्री नृसिंह जयंती साजरी करण्यात आली.ग्रंथ वाचन रविंद्र गायकवाड (पेन्टर ) यांनी केले. व्याख्यान बाळासाहेब गायकवाड,आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. परिसंवादात प्रकाश गायकवाड,विकास गायकवाड यांनी सहभाग घेवून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची खरी गरज समाजाला असल्याचे प्रतिपादन प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन पुस्तक वाचन व चर्चासत्र,ग्रंथ प्रदर्शन घेवून संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाँ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.यावेळी पुस्तक वाचन, चर्चासत्र व ग्रंथप्रदर्शन घेवून आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन साजरा करण्यात आला.
पुस्तक वाचन कु.अक्षरा सौदागर,सुशांत सौदागर, प्रतिक गायकवाड,स्वरूप पानढवळे,आर्यन गायकवाड यांनी केले. तर चर्चा सत्रात संजय सोनवणे,रामराजे गायकवाड,अक्षरा सौदागर,आनंद भैय्या गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.पुस्तक वाचनाने मस्तक संपन्न होते,संपन्न मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही व कोणाचे हस्तक ही होत नाही असे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. ग्रंथ प्रदर्शनालाही खुप चांगला प्रतिसाद मिळाला.



