सामाजिक

माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकरांनी सहकार व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सशक्त पिढी घडविली.              – ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री वरपगांवकर 

केज/प्रतिनिधी

लोकनेते माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर साहेबांनी राजकारणात माणसं जोडण्याला महत्व दिले होते.सर्व सामान्यमाणूस त्यांच्या बंगल्यावर जावुन आपली समस्या सांगत होता.प्रत्यक्षात वा फोन करून साहेब तो प्रश्न सोडवत असत.

शैक्षणिक संस्थाचे जाळे निर्माण करुन त्यांनी शैक्षणिकपिढी घडविली असे प्रतिपादन ह.भ.प. महंत भगवान महाराज शास्त्री वरपगांवकर यांनी केले.ते आडस येथे झालेल्या कै.बाबुरावजी आडसकर यांच्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सादर करतांना बोलत होते.या किर्तना पुर्वी रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले.त्यामध्ये 51 व्यक्तींनी रक्तदान केले.रोगनिदान शिबीरा चे क्षय रोग,शुगर, रक्तदाब,नेत्र रोग या विषयी निदान करुन मार्गदर्शन करण्यात आले.स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाईच्या पथकाने या मध्ये महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

या पुण्यतिथी निमित्त केज,अंबाजोगाई परिसरातील राजकीय, सामाजिक,पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या मध्ये प्रामुख्याने राजकिशोर पापा मोदी, रामभाऊ कुलकर्णी, केज न.पं.च्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड,हारुण इनामदार,दत्ता पाटील, राजेश्वर चव्हाण,बबन भैया लोमटे,हनुमंतमोरे, उदयसिंह दिख्खत, कमलाकर कोपले, उद्धव बापु आपेगावकर उपस्थित होते.या प्रसंगी अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी आलेल्याअतिथींचे आभार मानले.सुत्र संचालन वसंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश शिनगारे यांनी केले.या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन ऋषिकेश भैया आडसकर व रंजीत दादा आडसकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!