सामाजिकसाहित्यिक

महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्यास मुदतवाढ, प्रातिनिधिक कविता संग्रहास उदंड प्रतिसाद 

केज/प्रतिनिधी

महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त २०२६ –२०२७ सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने संपादक नवनाथ रणखांबे यांच्या संकल्पने तून साकारत असलेल्या या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहास राज्यभरा तील कवी,लेखकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून,आता पुन्हा कविता पाठविण्याची शेवटची मुदत दि.१० मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.या प्रातिनिधिक कविता संग्रहात दिग्गज नामवंत मान्यवरांच्या कविता कविता संग्रहात वाचकांना वाचावयास मिळणार आहेत.

या ऐतिहासिक काव्य प्रकल्पासाठी कवींनी समता,सामाजिक न्याय, मानवता,तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवन कार्य,त्यांचे मौलिक विचार,विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाड च्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक,माणूस जोडणाऱ्या आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची,मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे.तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे.अधिक माहिती साठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे९९६७४३५०३२,९९६७४८०९३२या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!