फूस लावून पळुन गेलेली पत्नी आता आपल्या प्रियकरासोबत पतीला करतेय ब्लॅक मेल,देतेय मारण्याची धमकी,पती भोळा भाबडा असल्यामुळे प्रियकरा सोबत संगणमत करून पत्नी करतेय सतत ब्लॅकमेल

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील वडवाडी या गावातील रहिवाशी असणाऱ्या विलास सुरवसे यांची पत्नी इंदुबाई सुरवसे हिचे वडवाडी नजीक असणाऱ्या बोरखेड या गावातील अशोक अनपट या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते.आणि या अनैतिक संबधातुन दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी इंदुबाई सुरवसे ही आपला पती बाहेरगावी कामानिमित्त गेला आहे ही संधी साधून,आपल्या दोन अपत्यांना न सांगता सकाळीच घराबाहेर पडली.
पती रात्री कामा वरून घरी परतल्यावर आमची आई सकाळीच ७ वाजता न सांगता घरातून गेली आहे अशी बातमी मुलानी पती असणाऱ्या विलास सुरवसे यांना सांगीतली. विलास सुरवसे यांनी आपल्या पत्नीची खूप शोधा शोध केली, नातेवाईकांकडे सुद्धा शोध व विचारणा केली परंतु इंदुबाई काही. मिळून आली नाही. शेवटी दोन दिवस शोधा शोध करून इंदुबाई न मिळून आल्याने पती विलास सुरवसे यांनी नेकनूर पोलीस स्टेशन गाठून सदर प्रकरणी पत्नी मिसिंग असल्या बाबत दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पत्नी इंदुबाई सुरवसे ही कुठेही मिस्सिंग झाली नव्हती तर ती अशोक अनपट रा.बोरखेड ता.जि.बीड या व्यक्ती सोबत पळून गेली होती.नेकनूर पोलिसांनी सदरील घटनेचा योग्य तपास करून अशोक यास ताब्यात घेऊन नेकनूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आले होते.
या ठिकाणी आल्यानंतर इंदुबाई सुरवसे या महिलेने असा जबाब दिला की,मला माझ्या पतीची गरज नाही मला माझ्या मुलांची देखील गरज नाही मी अशोक अनपट या तरुणासोबतच राहणार आहे.असा जबाब देऊन ही मिसिंग तक्रार नेकनूर पोलीस स्टेशन या ठिकाणी निकाली काढण्यात आली होती.मुळात अशोक अनपट हा व्यक्ती गुंड प्रवर्तीचा असून, अशोक अनपट हा तरुण आता या इंदुबाई नामक महिलेचा पती विलास सुरवसे व सासरे वसंत विश्वनाथ सुरवसे या दोघांनाही जिवे मारण्याच्या धमक्या तर देतच आहे.मात्र इंदुबाई हिस पुढे करून सतत दीड ते दोन लाख रुपयांची मागणी तो करत आहे.तुम्ही जर पैसे दिले नाहीतर तुम्हाला कुठेही,कधीही गाठून जिवे मारून टाकेल अशी धमकी सध्या विलास सुरवसे व त्यांचे वडील वसंत विश्वनाथ सुरवसे यांना देण्यात येत आहे.
इंदुबाई सुरवसे हीमहिला ज्या दिवशी घरातून निघून गेली होती तेंव्हा सदरील महिला गायब होत असताना या महिलेने घरातील रोख रक्कम ६० हजार रुपये व तीन तोळे सोने घेऊन पसार झाली होती, स्वतःच्या अनैतिक संबंधा मुळे इंदुबाई सुरवसे ही स्वतःच्या मर्जीने अशोक अनपट याच्या सोबत पळून गेली आणी पुन्हा तीने स्वतः नेकनूर पोलीस स्टेशनला हजर होतं जबाब दिला की,मी माझ्या मर्जीने अशोक अनपट सोबत निघून गेले,मला विलास सुरवसे ह्यच्या सोबत राहायचे नाही.सदरील घटनेची मिसिंग तक्रार निकाली निघली असताना देखील ही महिला व गुंड प्रवृत्ती असणारा अशोक अनपट हा तरुण महिलेचे पती विलास सुरवसे व सासरे वसंत सुरवसे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन दीड ते दोन लाख रुपयांची मागणी करत आहे.
सदरील विलास सुरवसे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. त्यातच वरून हा गुंडगिरी प्रवृत्तीचा अशोक आनपट व त्याच्यासोबत संगणमत करून इंदुबाई सुरवसे हे दोघे आता सतत पैशाची मागणी करत असल्यामुळे विलास सुरवसे व त्यांचे वडील वसंत सुरवसे हे सद्य परिस्थितीत खूप मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. सदरील घटनेची पोलीस प्रशासनाने योग्य चौकशी करून विलास सुरवसे वसंत सुरवसे यांना न्याय द्यावा अशी मागणी विलास सुरवसे वसंत सुरवसे यांनी केली आहे.



