कृषीसामाजिक

शेतकऱ्यांनी डी ए पी खतास पर्यायी खते वापरावीत – बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

राज्यामध्ये मागील तीन वर्षात खरीप हंगामात ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया,डीएपी,एमओपी, म्युरेट ऑफ पोटॅश संयुक्त खते व एसएसपी सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा वापर केला जातो.महाराष्ट्र राज्य हे मृदा परीक्षण व आरोग्य पत्रिकाचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे.

राज्यांमध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डीएपी खताची शेतकऱ्याकडून जास्त मागणी होणार आहे. डीएपी खतांमध्ये १८% नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षे प्रमाणे होत नाही त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे.स्फुरद युक्त खतांमध्ये डीएपी खता नंतर एस एस पी या खताची सर्वाधिक मागणी आहे.एस एस पी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद १६% सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आढळून येतात सल्फर अन्नद्रव्या मुळे तेलबिया पिकामध्ये एस एस पी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

डी ए पी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खताचा वापर डीएपीएस चांगला पर्याय आहे.एस एस पी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके १० : २६:२६,एनपीके – २० : २०: ० : १३, एनपीके – १२ : ३२ : १६, युरिया एस एस पी कॉम्प्लेक्स व एनपीके -१५ : १५ : १५, या खताच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते त्यामुळे या संयुक्त खताचा वापर केल्यास पिकासाठी पोषक ठरतो त्याचबरोबर पीएसपी या खतामध्ये ४६% स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खताचा वापर केल्यास तो देखील डीएपी खतास उत्तम पर्याय आहे चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खताचा वापर करण्याचे आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचेसंचालक बबनराव आंधळे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!