गुन्हेगारीसामाजिक

कपडे वाळायला घालण्याच्या दोऱ्या सोडल्या,रेल्वे कर्मचाऱ्यावर विळ्याने हल्ला 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कोरेगाव येथे कपडे वाळायला घालण्यासाठी बांधलेल्या दोऱ्या सोडल्याच्या कारणा वरून गोवा येथे रेल्वे विभागात ऑपरेटर म्हणुन कार्यरतअसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात विळा मारून व चापट-बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.केज तालुक्यातील कोरेगाव येथील श्रीराम भारत मुंडे वय २९ वर्ष हे गोव्यातील वेरणा रेल्वे स्टेशन येथे इलेक्ट्रीक इंजीनियर डिपार्टमेंटमध्ये प्रोफाईलऑपरेटर म्हणून नोकरीस आहे.

 

सुट्टी निमित्त ते कोरेगाव येथे गावाकडे आले होते.दि. १० मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान सुट्टी संपल्याने ते परत कर्तव्यावर निघाले असता,त्यांचे घराशेजारी दत्तात्रय किसन मुंडे यांनी घराचे समोर रस्त्यावर कपडे वाळायला घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या होत्या.त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या डोक्याला लागत असल्याने,गाडी वरुन पडु नये म्हणुन श्रीराम मुंडे यांनी त्या सोडल्या होत्या.यावरून दत्तात्रय किसन मुंडे व

सुरज दत्तात्रय मुंडे या दोघांनी रेल्वे कर्मचारी श्रीराम मुंडे यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ करीत त्यांच्यावर विळ्याने हल्ला करून डोक्यात विळा मारून जखमी केले.व चापटा बुक्क्या ने ही मारहाण करीत मुक्कामार देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. श्रीराम मुंडे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय मुंडे,सूरज मुंडे या दोघा बाप-लेका विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पोलीस निरीक्षक स्वप्नील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जमादार संगीता हनवते या पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!