सामाजिक

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचाळा येथील आपदा ग्रस्त शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची तातडीची मदत सुपूर्द,डॉ.प्रशांत पाटील यांच्या संवेदन शील पुढाकाराने कुलकर्णी कुटुंबाला आधार,परशुराम हिंदू सेवा संघ तर्फे लवकरात लवकर भरीव मदतीचे प्रदेशाध्यक्ष यांचे आश्वासन

वडवणी/प्रतिनिधी

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचाळा येथील आपदा ग्रस्त शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची तातडीची मदत सुपूर्द करण्यात आली.डॉ.प्रशांत पाटील यांच्या संवेदनशील पुढाकाराने कुलकर्णी कुटुंबाला थोडा आधार मिळाला आहे.तसेच परशुराम हिंदू सेवा संघ यांच्या वतीने लवकरात लवकर भरीव मदतीचे प्रदेशाध्यक्ष यांनी आश्वासन दिले आहे.

तसेच शासकीय मदती साठीही भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख यांना कॉन्फरन्स कॉल करून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना बोलून घटनास्थळावरून शासकीय मदतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसा पूर्वी शाॕर्टसर्किट होऊन २० क्विंटल कापूस आणि संपूर्ण संसार जळून खाक झाला होता चिंचाळा येथील अत्यंत हतबल शेतकरी यशवंत लक्ष्मणराव कुलकर्णी यांच्या कुटुंबाला आज भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, परशुराम हिंदू सेवासंघांचे प्रदेश संघटन सर चिटणीस व सिद्धी विनायक अर्बनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धीर दिला.तसेच ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ म्हणून त्यांनी वैयक्तिक रित्या लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त १०००० रुपयाचा धनादेश देऊन आर्थिक मदत शेतकरी कुटुंबाकडे सुपूर्द केली.

या कठीण प्रसंगी त्यांच्या संवेदन शील पुढाकारामुळे कुलकर्णी कुटुंबाला खूप मोठा मानसिक व आर्थिक आधार मिळाला आहे.तसेच त्यांनी परशुराम हिंदू सेवा संघांचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांना सर्वांचे समक्ष कॉल करून वरील भीषण नुकसानी विषयी माहिती सांगितली तर त्याचक्षणी विश्वजित देशपांडे यांनी सर्वांसमक्ष आम्ही लवकरात लवकर परशुराम हिंदू सेवा संघातर्फे भरीव मदत करू असे आश्वासन दिले.तर भाजपा बीड जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख यांना त्यांनी कॉल केला असता त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना बोलून व वडवणीचे तहसीलदार यांना कॉन्फरन्स वर घेऊन सर्वांसमक्ष वरील आपदा ग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर शासनातर्फे मदत करण्यासाठी सुचवले तर तहसीलदार यांनी सर्वां समक्ष अधिकृत मदत करण्याची ग्वाही दिली. तर बुधवार दि.३ जुन रोजी परळी येथे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांना वरील विषयी माहिती देऊन आणखी मदत मिळवून देणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी भाजपा माजलगाव शहराध्यक्ष व परशुराम हिंदू सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस विनायक रत्नपारखी,भाजपा माजलगाव शहर उपाध्यक्ष मा.पंचायत समिती सदस्य अविनाश कांडुरे,भाजपा सोशल मीडिया चे दत्ता महाजन परशुराम हिंदू सेवासंघाचे जिल्हा सचिव संतोष काटकर, परशुराम हिंदू सेवा संघाचे माजलगाव तालुका अध्यक्ष हरिभाऊ नवले,चिंचाळा गावचे सरपंच सुभाष आजबे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये रामदास बप्पा खटावकर,त्र्यंबक पायके,बालासाहेब शिंदे, डॉ.प्रकाश जोशी, शरद नाना कुलकर्णी,योगेश देवा जोशी,मुकुंद वाळेकर, नंदलाल खटावकर,अरुण आण्णा खटावकर,शामसुंदर काळकुटे,सुरेश जोशी, सत्यप्रेम आबुज,अशोक काळकुटे, अनंतराव देशमुख,केदार कुलकर्णी धनंजय कुलकर्णी, अनिकेत नाईकआदी गावकरी उपस्थित होते.

कष्टाने पिकवलेला २० क्विंटल कापूस आणि हक्काचा संसार डोळ्या देखत जळून खाक झाल्याने कुलकर्णी कुटुंब पूर्णपणे कोलमडले होते. मात्र लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. प्रशांत पाटील यांच्या रूपाने मिळालेली अल्प मदत म्हणून दहा हजार रुपयांचा आधार, सामाजिक संघटनांचा मिळालेला शब्द आणि प्रशासनाने दिलेली ग्वाही यामुळे या कुटुंबाला मोठे बळ मिळाले आहे.

चिंचाळा गावचे सरपंच सुभाष आजबे,पोलीस पाटील संजय कुलकर्णी व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी डॉ.प्रशांत पाटील व टीम चे या तात्काळ मदती बद्दल आणि शासन दरबारी केलेल्या प्रयत्ना बद्दल संपूर्ण गावाच्या वतीने आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!