कृषीसामाजिक

मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय –खा. रजनीताई पाटील

केज/प्रतिनिधी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा विषय आहे.कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ही बाब गंभीर आहे.सरकार सांगते आत्महत्या कमी झाल्या मात्र आत्महत्या वाढलेल्या आहेत.ओला दुष्काळ,अतिवृष्टी, नापिकी या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे

मराठवाड्यात दुष्काळ आणि विदर्भ भागांतील हवामान बदल आणि अनियमित पावसाचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे.कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या या भागातीलशेतकऱ्यांसाठी शाश्वत उपाययोजनांची नितांत गरज असल्याचे खा.रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत शेतकरी प्रश्नावर आवाज उठवला.मराठवाडा हा सलग दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा दोन्ही टोकाच्या हवामानाचा सामना करतो.

त्यामुळे येथे हैदराबादच्या धर्तीवर एक विशिष्ट प्रादेशिक केंद्र (Regional Centre of CRIDA) असावे,अशी मागणी खा. रजनीताई पाटील यांनी केली.अंतर्गत मराठवाड्यात आणि विदर्भात ‘अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प गतीने पुढे गेले पाहिजे हा सवाल उभा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!