गुन्हेगारी
चक्क जावयाला धमक्या देवून जमीन मागणा-या मेव्हणा व सासऱ्या विरुध्द केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
चक्क जावयाला धमक्या देवून जमीन मागणा-या मेव्हणा व सासऱ्या विरुध्द केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून तु आमच्या वर केलेल्या केसेस मागे घे व मौजे टाकळी,ता. केज येथील सर्व्हे क्रमांक ७७ मधील शेत जमीन माझ्या नावावर कर असे म्हणून शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देणारा मेव्हणा जूनेद उर्फ जोजो आणि सासरा शेख शाकेर अहेमद या दोघांविरुध्द ॲड. सलाहुद्दीन काझी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता चे कलम ३५१(२),३५२आणि ३ (५) प्रमाणे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिस करीत आहेत.



