भक्ती,सेवा आणि समर्पणाचा भव्य दिव्य सोहळा,कृतज्ञ अभिवादन – भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री

केज/प्रतिनिधी
भगवान श्रीकृष्ण आश्रम, केज येथे पार पडलेल्या भव्य आणि दिव्यधार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांचे जाहीर आभार भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले आहेत.पुढे बोलताना ते म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने,महान तपस्वी परम त्यागी श्री १०८ स्वामी चिन्मय पुरी जी महाराज (हिमाचल प्रदेश), तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांच्या पावन उपस्थितीत श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन १०८ कुंडी महाविष्णूयाग यज्ञ,संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह हा नऊ दिवसांचा सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात यशस्वी रित्या पार पडला.
या संपूर्ण कार्यक्रमात लाभलेले आपले प्रेम, सहकार्य आणि सेवाभाव हेच आमच्यासाठी खरे बळ ठरले.सर्व जाती- धर्मातील भक्तभाविकांनी दिलेल्या देणग्या,तसेच महाप्रसाद पंगतीसाठी पुढाकार घेणाऱ्या अन्नदात्यांचे योगदान हे खरोखरच प्रेरणादायी आहे.तसेच,या भव्य सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या स्वयंसेवकांचे,तसेच पंचक्रोशीतील आश्रमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त करतो.आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच श्रीकृष्ण मंदिर उभारणी चे हे पवित्र कार्य अधिक भक्कम होत आहे.हीच एकजूट,हा सेवाभाव आणि ही भक्तीभविष्यात ही अशीच कायम राहो, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना.
श्रीकृष्ण आश्रम व भक्त परिवार,केज आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद अशा शब्दात भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री व ह.भ.प.विष्णु महाराज राऊत यांनी भाविक भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.तसेच प्रसिद्धी माध्यमांनी सर्व माध्यमातून सहकार्य केले याबद्दल सर्व पत्रकार बांधव,संपादक यांचे आभार मानले आहेत.



