सामाजिक

अंबाजोगाई येथील भुमीपुत्र माजी न्यायमूर्ती सुधाकरराव कुर्डूकर यांचे निधन

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील भुमीपुत्र माजी न्यायमूर्ती भारताचे माजी मुख्य न्यायाधीश श्री.सुधाकर पंडितराव कुर्डूकर यांचे शनिवार २१ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्ष होते.

अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील मुळ रहिवासी असलेले सुधाकरराव पंडितराव कुर्डूकर हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्चन्यायालया चे सरन्यायाधीश म्हणून काम केले.मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणुन काम केले.पंजाब चे प्रभारी राज्यपाल म्हणुन ही त्यांनी काम पाहिले.योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्व साधारण सभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

सेवानिवृत्त झाल्यानंतर ही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सहाय्यक सरकारी वकील आणि सार्वजनिक अभियोक्ता, शासनाच्या विविध प्रकल्पाचे सल्लागार म्हणुन काम पाहिले. कुर्डूकर यांच्या पश्चात पत्नी,मुली,जावई, नातवंडे,भाऊ असा परिवार आहे.सुधाकर कुर्डूकर यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमी,चारणी रोड गिरगाव,मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!