विवाहितेचा छळ करून घरातून हाकलून दिले, पती व सासु यांच्यावर गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
तीन लाख रुपये माहेरहून घेवून ये म्हणुन विवाहितेचा छळ करून तीला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्या मुळे पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती व सासू विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गून्हा नोंद झाला आहे.केज तालुक्यातील लाखा येथील सीमा हिचा विवाह आळणी जिल्हा धाराशिव येथील किरण पौळ यांच्याशी दहा वर्षां पूर्वी झाला होता.
परंतु पती आणि सासू यांनी माहेरहून तीन लाख रुपये घेवून ये म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून व तीला मारहाण करून तीला जीवे मारण्याची धमकी धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिल्या प्रकरणी सीमा किरण पौळ यांच्या फिर्यादी वरून किरण पौळ पती व रंजना पौळ सासू या दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गून्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.

