अवैध दारू विक्री बंद करा,काळेगाव घाट ग्रामपंचायतने घेतला दारूबंदीचा ठराव

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील काळेगावघाट येथील अवैध दारू विक्री मुळे अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत.त्यामूळे ग्राम पंचायतने दारू बंदीचा ठराव घेवून गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सरपंच अविनाश गाताडे सह साठ गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.काळेगाव घाट येथे दारू बंदीचा ठराव ग्रामपंचायतने सर्व सदस्यांच्या संमतीने घेतला आहे.त्यानुसार गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश गाताडे यांच्या सह ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
काळेगावघाट येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असून गावातील तरुण वर्ग दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूच्या नशेत रस्त्यावर शिवीगाळ करीत वाद करीत आहेत.या व्यसनामुळे अनेकांचे संसार व कुटुंब उध्वस्त होत आहे.या वाढत्या प्रकारची दखल घेऊन गावात दारू विक्री बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली होती.
त्यानुसार दि.२६ जानेवारी रोजी सरपंच अविनाश गाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशांत सुंदरराव कोठावळे यांनी गावात दारू बंदी करण्याचा ठराव मांडला.त्याला राहूल रवींद्र कोठावळे यांनी अनुमोदन दिल्या नंतर गावात दारू विक्री बंद करण्याचा ठराव सर्वानुमत्ते मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्याचे ठरविण्यात आले.
त्या नुसार गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी,अशी मागणी सरपंच अविनाश गाताडे, ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासह योगीराज कोठावळे,आकाश गाताडे,बहाद्दूर मुलानी, अरुण गाताडे,युवराज आगे,त्रिंबक कोठावळे, दत्तात्रय कोठावळे, पांडुरंग कोठावळे, बालासाहेब डोरले, संग्राम आगे यांच्यासह साठहून अधिक ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्याकडे केली आहे.



