शैक्षणिक

शाळा मुल्यांकन व आश्वासन आराखडा स्काफ मुल्यांकनात साने गुरुजी निवासी विद्यालय केज या शाळेला अ प्लस श्रेणी प्रदान

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्या साठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळां साठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे.

या मुल्यांकनात येथील साने गुरुजी निवासी प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळांना अ प्लसश्रेणी हा दर्जा प्रदान करण्यात आल्याने या शाळेने नावलौकिक प्राप्त केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड साहेब,उपाध्यक्ष राजेश कापसे सर व संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता कराड गित्ते मॅडम यांचे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध स्तरातून कौतुक करुन अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!