शैक्षणिकसामाजिक

जीवन विकास शिक्षण मंडळ,केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे आयोजन,शुभारंभ ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी व ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने होणार 

केज/प्रतिनिधी

केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे दि.२० एप्रिल २०२६ ते दि.२६ एप्रिल २०२६ या कालावधीत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये सायंकाळी ७:०० ते ८:३० या वेळेच्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानमालेने या वर्षी २६ व्या वर्षात पदार्पण केले आहे.ही व्याख्यानमाला श्रोत्यांच्या मनाला, बुध्दीला आणि आत्म्याला स्पंदित करुन स्फुर्ती,प्रेरणा,जिद्द, सामर्थ्य,उत्साह तसेच ध्येयांचे पर्व निर्माण करणारी ठरत आहे.

तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन जीवन विकास शिक्षण मंडळाचे संचालक, संयोजक व सर्व शिक्षक, प्राध्यापक वृंद यांनी केले आहे.यावर्षी व्याख्यान मालेचा शुभारंभ दि.२० एप्रिल २०२६ वार सोमवार रोजी माजलगाव येथील कवी, लेखक, प्रबोधनकार ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी व केज येथील ह.भ.प.केशव महाराज शास्त्री,भगवान श्रीकृष्ण आश्रम,बीड रोड केज यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनाने होणार आहे.या दिवशी माजलगाव येथील कवी, लेखक,प्रबोधनकार, ह.भ.प.प्रणव महाराज पटवारी यांचे ” वर्तमान युगातील संतवाङ्मयाची प्रासंगिकता” या विषया वर व्याख्यान होणार आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. केशव महाराज शास्त्री भगवान श्रीकृष्ण आश्रम बीड रोड केज हे उपस्थित राहणार आहेत.

दि.२१एप्रिल रोजी प्रमुख व्याख्याते श्री. उदय देवळाणकर , शेती व पर्यावरण अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर विषय-“शेती आणि माती “अध्यक्ष- रमाकांत कुलकर्णी ( बापू ) लेखक तथा जल अभ्यासक, लातूर.दि.२२ एप्रिल- प्रमुख व्याख्याते- डॉ. मधुश्री संजीव सावजी छत्रपती संभाजीनगर, अखिल भारतीय मंत्री, विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान विषय-“महिला सक्षम असतातच..!”अध्यक्षा- सौ.दिपाली काटे प्रवचनकार तथा ज्ञानेश्वरी अभ्यासक, रामकृष्ण परमहंस परिवार,केज दि.२३ एप्रिल- प्रमुख व्याख्याते- डॉ.राम जावळे,रोग प्रतिबंधन तज्ञ तथा जनरलसर्जन,जिजामाता आरोग्यालय,हॉस्पिटल लातूर,विषय ” आपले आरोग्य आपल्या हाती कसे घ्यावे ? “अध्यक्ष- डॉ.दिनकर राऊत बालरोग तज्ञ,योगिता हॉस्पिटल केज दि.२४ एप्रिल- प्रमुख व्याख्याते- प्राचार्य सोमनाथ रोडे विभागीय अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद,छत्रपती संभाजीनगर विषय- ” जाती तोडो भारत जोडो “अध्यक्ष- दगडू दादा लोमटे कार्यकारिणी सदस्य,मराठवाडा साहित्य परिषद,छत्रपती संभाजीनगर दि.२५ एप्रिल- प्रमुख व्याख्याते- श्री.बापू सर्वगोड लेखक, दिग्दर्शक,चित्रपट प्रशिक्षक,मुंबई विषय- ” भारतीय चित्रपट सृष्टी : बदलती निर्मिती आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीचा प्रवास “अध्यक्ष- प्रविण जी देशपांडे संचालक, दि.वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँक लि.परळी वैद्यनाथ,दि.२६ एप्रिल- प्रमुख व्याख्याते- श्री. विलास बडे सहसंपादक, न्यूज १८ मराठी मुंबई विषय- “युद्धजन्य परिस्थितीत माध्यमांची भूमिका “अध्यक्ष- सुहास सरदेशमुख विशेष प्रतिनिधी दै.लोकसत्ता, छत्रपती संभाजीनगर.

सदरील व्याख्यानमालेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक,प्राध्यापक व कर्मचारीवृंद, स्व.प्रमोद महाजन कनिष्ठ महाविद्यालय,स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक,प्राथमिक, स्वयंअर्थसहाय्यित,स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल, केज जि.बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!