सामाजिक

ग्रामीण भागातील घरकुल धारकांना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग,आणि इतर  समाजातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून ५० हजार रुपये इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुपये ६० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन,सीबीडी बेलापूर,नवी मुंबई यांना नियंत्रण अधिकारीआणि उपसंचालक राज्य, व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे .

वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थ नियमावली पुस्तिका नुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दखल घेण्याची तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व संबंधितांना सादर करावयाची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण,गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई,यांची राहील याबाबतचा खर्च सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग,व अल्प संख्यांक यांचे कल्याण ०३ मागासवर्गीयांचे कल्याण १०२- आर्थिक विकास (०१) विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,व विशेष मागास प्रवर्ग,यांचे कल्याण प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ (अतिरिक्त राज्य हिस्सा) ( २२२५ जी ६५३)आर्थिक तरतुदीतून मागविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!