जय परशुराम च्या घोषणाने केज शहर दणाणले,शोभायात्रेत भगव्या शाली,टोप्या मुळे वातावरण भगवे मय, भगवान परशुरामाच्या बाबतीत अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या – ह.भ.प.लक्ष्मण महाराज इनामदार


केज/प्रतिनिधी
केज शहरामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जय परशुराम घोषणेने शहर दणाणले तसेच भगव्या शाली व टोप्या समाज बांधवांनी परिधान केल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.भव्य मिरवणूक मोटरसायकल रॅली व्याख्यान आरती प्रसाद व जय परशुरामच्या घोषणाने केज शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. शनिवार दि.१८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते अशा विविध उपक्रमाने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. शोभायात्रेत सर्व महा पुरुषांच्या चौकांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.केज शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव रविवार दिनांक १९ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर साजरा करण्यात आला .
यावेळी वकीलवाडी हनुमान मंदिरापासून भगवान परशुरामाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भगवान परशुराम यांच्या शोभायात्रे सोबतच मंत्रोच्चार करण्यात आले वकीलवाडी हनुमान मंदिर ते बालाजी मंदिर या पूर्ण वेळात शांतीपाठ तसेच वेदोक्त मंत्र चार श्री सूक्त आधीचे पाठ करण्यात आले तसेच भव्य मोटारसायकल रॅली भगवान परशुरामांच्या शोभा यात्रा प्रतिमेसह संपूर्ण शहरात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत पुष्पहार अर्पण करण्यात आला तेथून पुढे संत भगवान बाबा चौकात संत भगवान बाबांचा जय घोष करत पुष्पहार अर्पण करण्यात आला.महात्मा ज्योतीबा फुले चौकात फुले यांना पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला मंगळवार पेठ कॉर्नरला छत्रपती संभाजीमहाराज चौकाला पुष्पहार अर्पण करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयघोष करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत पुष्पहार अर्पण करण्यात आला. बालाजी मंदिरामध्ये रॅली पोहोचल्यानंतर ह.भ.प. लक्ष्मण महाराज इनामदार यांचे व्याख्यान झाले या व्याख्यानात भगवान परशुराम यांच्या बद्दल अनेक मिथ्या माहिती पसरवण्यात आली असून भगवान परशुराम हे अन्यायाच्या विरोधात शस्त्र उचलणारे भगवान विष्णूचे सहाव्या अवतार होते तसेच साधू संतांचे रक्षण करणारे होते.ऋषीमुनींचा वारसा चालवणारी होते चारी वेदांचे ज्ञाता होते.भगवान परशुराम हे पिता आज्ञाधारक तसेच मातृभक्त होते त्यामुळे भगवान परशुराम हे शौर्य,धर्म,त्यागाचे प्रतीक होते तसेच भगवान परशुराम हे भगवान श्रीहरी विष्णूचा सहावा अवतार असल्याने व सप्तचिरंजीवांपैकी एक असल्याने आजही आदर्श चरित्र आहेत असे ह.भ.प.लक्ष्मण महाराज इनामदार यांनी सांगितले
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये आंबेजोगाई नगर परिषदेची उप मुख्याधिकारी पदाची सूत्र असणारे श्री. सचिनजी देशपांडे, महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिलजी महाजन,वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे निवृत्त नायब तहसीलदार सुनील देशपांडे,दोन मुले एमबीबीएस ला लागणारे बाळासाहेब शेटे,अटल बिहारी वाजपेयी आयुर्वेदिक महा विद्यालयात लागलेली मृण्मयी प्रवीण देशपांडे यांच्यासह मान्यवरांचा तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच रांगोळी स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्या चा प्रशस्तीपत्र व रोख रकमे सह सत्कार करण्यात आला.
त्यानंतर भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला.हा जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्या साठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व्यंकटेश महाजन, धनंजय कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास केजकर, सचिव श्रीधर खोत, उपाध्यक्ष श्रीराम शेटे, कोषाध्यक्ष शिवराज मुथळे,प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या सह समाज बांधवांनी प्रयत्न केले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.



