शैक्षणिक

केज येथील प्रा.वि.दा. कराड विद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरुळीत सुरू

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण मंडळ यांच्यामार्फत सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षांचा केज येथील प्रा.विश्वनाथराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर सुरळीत पणे प्रारंभ झाला आहे. अशी माहिती केंद्रप्रमुख प्राचार्या माधुरीताई मुंडे जाधवर यांनी दिली.

बारावीच्या परीक्षेसाठी शासन व परीक्षा मंडळाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालनकरण्यात येत आहे.परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडली जात आहे.तसेच विविध विभागांची भरारी पथके, बैठे पथके आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शांत,सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या केंद्रावर केज शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे प्राचार्या माधुरीताई मुंडे जाधवर यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!