शैक्षणिक

उमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विविध गीतावर विद्यार्थ्यांनी धरला ठेका

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील उमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या बाबतीत सविस्तर वृत्त असे की,उमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दि.१४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी बालवाडीतील चिमुकल्यांनी,मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती,भावगीते, लावण्या अशा विविध गीतावर ठेका धरत प्रेक्षकांचे मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुनील केंद्रे गट शिक्षण अधिकारी केज हे होते तर अध्यक्ष म्हणून राजाभाऊ इंगळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी मुख्याध्यापक हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय चाटे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी केज, सरपंच सौ.सुमनबाई मुळे, बाळासाहेब सावंत उपसरपंच संजय चौरे, अर्जुन बोराडे,सुरेश काळे,देशमुख मॅडम, जगदाळे मॅडम,सौन्नर सर,मदने सर,मुंडे सर सहशिक्षक महादेव मुळे सर,लक्ष्मण घुले सर, सौ.लता बांगर मॅडम, सौ.प्रणिता शिंदे मॅडम, अरुण पवार,सौ.प्रतिभा भडके मॅडम,भैय्यासाहेब मुळे,नाना मुळे, फोटोग्राफर रामदास मुळे,फोटोग्राफर भैरट, सुशेन मुळे,तुषार यादव, आश्रुबा खरात आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक बाबासाहेब केदार व नाईकनवरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजाभाऊ इंगळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!