प्लॉट खरेदीसाठी माहेर हून १० लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ पती, सासू,सासरे यांच्यासह सात जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील नाव्होली येथील एका विवाहितेला प्लॉट खरेदी साठी माहेरहून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पती,सासू,सासरे यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्या तील सारूळ येथील पुनम हिचा विवाह नाव्होली येथील जयदत्त बिक्कड यांच्याशी सन २०२२ मध्ये झाला.विवाहानंतर काही काळ सासरकडील मंडळींनी नीट वागणूक दिली.मात्र ३१ ऑक्टोबर २०२२ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पत्नीच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले,असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.तसेच सासरच्या मंडळींनी संगनमत करून फ्लॅट/प्लॉट खरेदीसाठी माहेरहून १० लाख रुपये आणण्याची सतत मागणी केली.यासाठी नाव्होली व पुणे येथे मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. “तुला मुलबाळ होऊ देणार नाही”असे म्हणत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादी पुनम जयदत्त बिक्कड (वय २६,रा . नाव्होली ,मूळ रा. सारूळ)यांच्या तक्रारी वरून पती जयदत्त बाबासाहेब बिक्कड, सासरे बाबासाहेब देविदास बिक्कड, सासू गवळणबाई बाबासाहेब बिक्कड (रा.नाव्होली,ता. केज,जि.बीड),नणंद दिपाली बाबासाहेब ढाकणे व नंदावे बाबासाहेब विठ्ठल ढाकणे (रा.उपळाई,ता.कळंब), तसेच नणंद ज्योती संतोष तांदळे व नंदावे संतोष रावसाहेब तांदळे (रा. धोंडराई,ता.गेवराई) अशा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत आहेत.

