शैक्षणिकसांस्कृतीक

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचोली माळी येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न 

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचोली माळी येथे वार्षिक स्नेह संमेलन दि. ४ फेब्रुवारी रोजी मंगळवारी रात्री ६ ते ११ वाजण्याच्या दरम्यान घेण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात माता सवित्री आणि जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन गावच्या प्रथम नागरिक सौ.रोहीणीताई सुनिल देशमुख सरपंच चिंचोली माळी यांच्या हस्ते करून श्री गणेश वंदना या गिताने सुरुवात करण्यात आली.

शाळेत यापुर्वी लहान चिमुकल्यां चा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नव्हता त्यामुळे गावातील सर्वच नागरिक विद्यार्थांचे पालक,महिला व जेष्ठ नागरिक तरुण वर्ग अत्यंत उत्साहात व आनंदाने गावातील भावी पिढी घडवण्याच्या प्रेरणेने सर्वच जण एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक यांनीआपल्या विद्यार्थ्यांना खुपच उत्कृष्ट आणि कमी कालावधीत त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून असा दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे शाळेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

प्रत्येक पालक एकमेकास उत्साहाने आपल्या पाल्याला बदल बोलत असताना शाळेचे कौतुक करत होता या कार्यक्रमात देशभक्ती गीते देवीचे गिते,लावणी,लोक गीते एकापेक्षा एक बहारदार गाण्यावर चिमुकल्यांनी देदिप्यमान नृत्य सादर केले.रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम संपन्न झाला.तोपर्यंत गावातील सर्वच माता भगिणी तरुण वर्ग यावेळी उपस्थित होता.

या कार्यक्रमास गावातील सर्व राजकीय क्षेत्रातील प्रमुख गटतट विसरून चिमुकल्यांच्या नृत्यांचा आस्वाद घेऊन बक्षिसांचा वर्षाव करत होते.मराठी माध्यम व उर्दु माध्यम शाळेतील सर्वच शिक्षक एकदिलाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी परिश्रम घेत होते.या कार्यक्रमासाठी गावातील जेष्ठ भाजपा नेते सुनिल आबा गलांडे,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अरुण काळे, राम मेजर राऊत,माजी सरपंच सुनिल देशमुख, माजी उपसरपंच जितेंद्र देशमुख, पवन पवार, शिवसंग्रामचे नेते बाळा साहेब गलांडे,ग्राम पंचायत सदस्य अशोक शिंदे,रामभाऊ गलांडे, बालाजी राऊत,अजिज शेख सर्वच ग्राम पंचायत सदस्य व सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य त्याच बरोबर गुलाब पठाण, विठ्ठल झाडे,अमर घोडके, पत्रकार संतोष गालफाडे, कर्मवीर विद्यालय चिंचोली माळीचे मुख्याध्यापक व सर्वच स्टाफ त्याच बरोबर शिक्षणप्रेमी नागरिक दगडु दळवी,दिलीप गायकवाड, राजेगाव शाळेचे मुख्याध्यापक शिनगारे सर,प्राथमिक शाळेचे माजी मुख्याधापक भांगे सर,सातव मॅडम,वर्षा माळी मॅडम व संस्कार इंग्लीश स्कूलचे अध्यक्ष अनिल गलांडे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य हा कार्यकम संपेपर्यंत उपस्थितीत होते. त्यामुळे हा कार्यक्रम तालुका पातळी पेक्षाही मोठा आणि उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजयजी गलांडे,जेष्ठ सहशिक्षीका सुरेखाताई पिसे,वानखेडे मॕडम, मनिषा सोनवणे मॅडम, शेख मॅडम,बाराते मॅडम, नाईकवाडे सर,घुले सर, अमोल राऊत सर, मुज्जमील शेख यांनी व आंगणवाडीताई यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अमोल राऊत सर व वानखेडे मैडम यांनी केले.

कार्यक्रमासाठी परिश्रम घेतल्याचे व सर्व पालक व शिक्षकाचे राम मेजर राऊत यांनी भरभरून कौतुक केले.विशेष सहकार्य म्हणून साऊंड सिस्टिम,लाईट सिस्टिम स्टेज सर्वच सेवा मोफत देऊन लक्ष्मण गलांडे यांनी मोलाचे सहकार्य केले व धनंजय शिंदे यांनी बैठक व्यवस्था केली या दोघांचे ही आभार व्यक्त केले.अशा प्रकारे न भुतो न भविष्यती असा उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!