गुन्हेगारी

पावणे दहा कोटीचे कोकेन आणि एमडी ड्रग जप्त,दोन विदेशी महिला अटक एपीआय बास्टे यांची धडक कारवाई

मुंबई/प्रतिनिधी

वसई नालासोपारा च्या पूर्वेकडील मोरगाव परिसरात मुंबईपोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई केली.तेथील एका इमारतीत छापा टाकून पोलिसांनी सुमारे ९ कोटी ७० लाख २६ हजार रुपये किमतीचे दहा किलो ३२७ ग्रॅम वजनाचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.या प्रकरणी युगांडातील दोन महिलांना ताब्यात घेतले असून या संपूर्ण कारवाई मध्ये मूळचे अंबेजोगाई येथील असलेले आणि सध्या मुंबई येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बास्टे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची पडताळणी करण्यासाठी जम्बो ऑपरेशन राबवले जात असताना मोरेगाव तलाव जवळील प्रियंका अपार्टमेंट रूम क्रमांक २०६ मध्ये पथकाने छापा टाकला.या रूममध्ये युगांडा येथील वय ३३ आणि वय २७ असलेल्या दोन महिला राहत होत्या.

त्यांच्या हालचालीवर संशय आल्याने घराची झडती घेण्यात आली यामध्ये फ्रीजच्या मागे लपवून ठेवलेले एक किलो ४०५ ग्रॅम कोकेन आणि हॉलमध्ये ठेवलेले आठ किलो ९२२ ग्रॅम मेफेड्रोन असा एकूण दहा किलोचा साठा असलेले अंमली पदार्थ,दोन मोबाईल आणि वजन काटा आदी मुद्देमाल जप्त केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे वास्तव्यास असलेल्या सदर महिलांकडे पासपोर्ट व्हिसा नसल्याचेही उघड झाले आहे.दोन्ही महिला वर एन डी पी एस कायदा आणि विदेशी नागरिक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद बास्टे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!