कृषीसामाजिक

ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनेचे कळंब येथे उप विभागीय अधिकारी,तहसीलदार यांना निवेदन,आपण आपल्याला किती दिवस लुटू द्यायचे – भाई मोहन गुंड 

कळंब/प्रतिनिधी

ऊस दरवाढी संदर्भात कळंब तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट कारखानदार आणि गुळ पावडर कारखाने करत आहेत या संदर्भात कार्यकर्ते शेतकऱ्यांनी कल्पना दिल्यानंतर दि. २९ डिसेंबर रोजी उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आला आहे,इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये गुळ पावडर व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना सन २०२५- २६ साठी दर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे,अन्यथाआंदोलनाचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते ऊस दरा तील तफावत न दूर झाल्यास कळंब तालुक्यात आंदोलन करण्याचे पत्र दिलं आहे, कळंब तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे कोणाला काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन भाई मोहन गुंड राज्य चिटणीस मंडळ सदस्य शेकाप यांनी केले आहे.यासाठी त्यांनी मो.नं.९४२३९७९४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!