केज तालुक्यातील युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये अँड.मनीषा कुपकर पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सुर्डी गावातील झुंजार आणि लोकाभिमुख महिला. नेत्या म्हणून परिचित असलेल्या अँड.मनीषा कुपकर पाटील यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीबाबत समाजा तून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले व्यापक काम तसेच अलीकडेच झालेल्या बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत महिला प्रतिनिधी म्हणून मिळवलेले घवघवीत यश लक्षवेधी ठरले आहे.
मनीषाताई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि गरजू घटकांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे.विविध सरकारी योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या अडचणींना न्याय मिळवून देणे यासह अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी अग्रणी भूमिका बजावली आहे.
मराठाआरक्षण आंदोलना दरम्यान जाळपोळीच्या प्रकरणांत अन्यायाने अडकलेल्या अनेक मराठी तरुणांचे मोफत जामीन करून देत त्यांनी त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा दिला.कोणत्याही वंचित, पीडित व्यक्तीने मदतीचे आवाहन केल्यास तात्काळ प्रतिसाद देणे ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक बाजू मानली जाते.
त्यांच्या तडफदार नेतृत्व शैलीमुळे,कायदेविषयक जाणिवेमुळे आणि लोकाभिमुख कार्यपद्धती मुळे केज तालुक्यातील युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना संधी देण्यात यावी,अशी एकमुखी मागणी नागरिक महिला बचतगट,शेतकरी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
समाजाने दाखवलेला विश्वास मोठा आहे.
युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या विकासासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे असेही मनीषाताईंनी सांगितले.



