सौ.अश्वीनीताई घोडके तेलगाव जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविणार

बीड/प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी साठी उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करताना दिसुन येत आहेत.तेलगाव राखीव जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविणार असल्याचे सौ. अश्विनीताई घोडके यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
दिंद्रुड येथे रहिवासी असलेले भाऊसाहेब घोडके हे आमला येथील मुळ रहिवासी आहेत.तेलगाव जिल्हा परिषद गटातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे मतदार संघात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे.भाऊसाहेब घोडके हे भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव असुन भारतीय नरेंद्र मोदी संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच संत रविदास महापीठाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.ब्रजवासी गोरक्षक सेनेचे महामंत्री म्हणून ते कार्यरत आहेत.
त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या मदतीला धावून जात असतात त्यामुळे मतदार संघात त्यांच्या विषयी सहानुभूती व्यक्त होताना दिसत आहे.आपल्या अडीअडचणीला धाऊन येणारा भाऊसाहेब घोडके यांना निवडून आणण्या साठी जिवाचे रान करणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.स्वच्छ चारित्र्य असलेला कोरी पाटी असलेले भाऊसाहेब घोडके यांच्यासौभाग्यवती सौ.अश्विनीताई घोडके यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



