जनसंपर्क दौऱ्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; केतकीताई सातपुते निवडून येतील, ग्रामस्थांचा ठाम विश्वास

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद सर्कल होळ अंतर्गत जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.या दौऱ्यात बनसारोळा, इस्थळ व सावळेश्वर या गावांना भेट देण्यात आली.यावेळी सर्व मित्र परिवार,कार्यकर्ते व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.यादौऱ्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची विशेष भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला.
उपस्थित ज्येष्ठांनी पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी केतकीताई किरण सातपुते यांना शुभेच्छा दिल्या.तसेच या भागातील विकासात्मक कामांसाठी सकारात्मक सहकार्य करण्याची भावना व्यक्त करण्यात आली.संपूर्ण जनसंपर्क दौऱ्याला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले.
ग्रामस्थांनी केतकीताई सातपुते निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.या संपर्क दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात जनसंपर्क अधिक मजबूत होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



