सामाजिक

संविधान दिन व महात्मा फुले स्मृतीदिनाचे औचित्य साधून आझाद क्रांती सेना व लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने मान्यवरांना संविधानाचे वाटप

केज/प्रतिनिधी

भारतामध्ये दरवर्षी दि. २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान सभेत मंजूर करण्यात आले.हा दिवस भारतीय संविधान तयार करणाऱ्या सर्व विधिज्ञ,सदस्य,आणि विशेषतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. संविधान प्रत्यक्ष अंमलात २६ जानेवारी१९५० रोजी आले,पण मंजुरीचा दिवस म्हणून २६ नोव्हेंबर अत्यंत महत्त्वाचा आहे.

संविधान दिन व महात्मा फुले स्मृतीदिनाचे औचित्य साधून आझाद क्रांती सेना व लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी केज शहरातील अनेक मान्यवरांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबुराव गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. नागरगोजे साहेब,केज पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री.नितीन मांजरमकर साहेब, केजच्या पुरवठा विभागा च्या नायब तहसीलदार मा.श्री.रामटेके मॅडम यांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.बाबुराव गालफाडे सर,आझाद क्रांती सेनचे तालुका प्रमुख श्री.शरद थोरात,आझाद क्रांती सेनचे तालुका उपप्रमुख अनिल लोखंडे,आझाद क्रांती सेनेचे शहर प्रमुख इरफान पठाण, बाळासाहेब जोगदंड सर, एस.के.वैरागे,शाम गालफाडे,सूर्यकांतलांडगे, बाळासाहेब पोळ,लखन पोळ,भागवत जोगदंड, सतीश शिंदे,आश्रूबा खाडे,साहिल तांबोळी, ईश्वर बारगजे,अमन पठाण,गोविंद चौरे,इम्रान तांबोळी इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!