शैक्षणिक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी निवासी विद्यालयाने पटकावले एकूण चार पारितोषिके 

केज/प्रतिनिधी

५३ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज व साने गुरुजी निवासी विद्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच साने गुरुजी निवासी विद्यालय केज या ठिकाणी संपन्न झाले.

यात माध्यमिक गटातून पवार अजित बाळासाहेब यांच्या बहुउपयोगी सोलर प्लेट या प्रयोगास तृतीय क्रमांक तसेच उच्च प्राथमिक दिव्यांग गटातून कु.पूजा ठोंबरे हीच्या जल शुद्धीकरण या प्रयोगास प्रथम क्रमांक,माध्यमिक शिक्षक गटातून श्रीमती नागरगोजे मनिषा यांच्या डिजिटल युगात ए आय च्या मदतीने विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणासाठी साहित्य निर्मिती यास प्रथम क्रमांक तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून आकाश केदार यांच्या बहू उपयोगी पिठाची चाळणी या प्रयोगास प्रथम क्रमांक मिळालेला आहे.अशा एकूण चार पारितोषिक सह साने गुरुजी निवासी विद्यालय तालुक्यात अव्वल ठरले आहे.

या सर्वांना विज्ञान शिक्षिका नागरगोजे मॅडम,श्रुती लहाने मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.उद्धवराव कराड सर, राजेश कापसे,प्रा.डॉ. कविता गित्ते कराड मॕडम यांनी या सर्वांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!