सामाजिक

जिवाचीवाडी येथे लोकनेते स्व.गोपिनाथ राव यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक व लोकहिताचे कार्यक्रम घेऊन वाहिली आदरांजली

केज/प्रतिनिधी

लोकनेते स्व.गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त व पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार जिवाची वाडी येथे सामाजिक व लोकहिताच्या दृष्टीने विशेष कार्यक्रमाचे आयोजनकरून लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन ठरेल याच उद्देशाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून तसेच यशस्वी अधिकारी, गीतकार यांचा सत्कार करण्यात आला.मुंबई पोलिस भरतीमध्ये कु.शितल हनुमंत चौरे, कु.गिताजंली हनुमंत चौरे या दोन सख्ख्या बहिणीं ची निवड पोलिस दलात झाली विशेष म्हणजे यापुर्वी उषा चौरे,अर्चना चौरे या दोघी देखील मागील पोलिस भरती मध्ये निवड झाली आहे. ह्या चौघी सख्या बहिणी आता पोलिस दलात कार्यरत झाल्या याचा गावातील सर्वांना अभिमान वाटतो.

माय-बापाच्या कष्टाची जाणीव आणि परिस्थिती चे भान ठेवून यशस्वी होणाऱ्या या लेकींचा संघर्ष खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व आनंददायी वाटतो.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळवून श्री.परमेश्वर आसाराम चौरे यांची देखील एम एस एफ पदावरती नियुक्ती-निवड झाली.मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेले अशोक विष्णू चौरे यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच गावातील तरूण प्रसाद नागरगोजे व अमर नागरगोजे या दोन युवकांच्या आवाजात स्व.गोपिनाथराव मुंडे साहेब यांचे गीत पूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले आहे त्यांचा देखिल सन्मान आज गावकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

सामान्य माणसाला निराधार व श्रावणबाळ पगार लाभ व विविध शासकीय योजना राबविण्यात आल्या व पुढे प्रशासन दरबारी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.केज जिवाचीवाडी या एसटी बसला श्रीफळ फोडून हिरवा कंदील दाखवला.या कार्यक्रमा साठी उपस्थित मा.जि.प. सदस्य श्री.विजयकांत भैय्या मुंडे,श्री.शरद बप्पा गदळे ज्ञानदिप ॲकडमी चे संचालक श्री.दराडे सर व श्री.स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय दवाखाना, अंबाजोगाई येथील टीम गावातील तरूण मंडळी ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!