
केज/प्रतिनिधी
गोपिनाथ गडावरुन ना.पंकजाताई मुंडे यांनी जैविक शेतीचा संकल्प केला असून केज चे भुमीपुत्र कमलाकर सोनवणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले होते.मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि शेतकरी हिताचे संकल्प करण्यात आले.यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शेती आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण संकल्प जाहीर केला. रासायनिक खतांचा वाढता वापर जमिनीची सुपीकता कमी करत असून त्याचा परिणाम उत्पादन, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी स्वतःजैविक शेती करण्याचा संकल्प केला.शाश्वत शेती आणि निरोगी भविष्यासाठी जैविक शेती हाच उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ना.
पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या या संकल्पातून प्रेरणा घेत केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मार्गदर्शक कमलाकर सोनवणे यांनीही जैविक शेतीचा प्रसार करण्या साठी पुढाकार घेतला आहे.केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता त्यांनी केज तालुक्यातील शेतकऱ्यांना जैविक खतांची माहिती, मार्गदर्शन आणि उपलब्धता करून देण्याचे काम सुरू केले आहे.आज अनेक शेतकरी रासायनिक खतांच्या वाढत्या किमती,जमिनीची घटती सुपीकता आणि उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडले आहेत.अशा परिस्थितीत जैविक खते जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवतात,सूक्ष्मजीवांचे प्रमाण टिकवून ठेवतात आणि पिकांच्या गुणवत्तेत वाढ करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते.
कमलाकर सोनवणे यांच्या माध्यमा तून उपलब्ध होत असलेल्या जैविक खतांचा फायदा सोयाबीन,उडीद,मूग, तूर,मका,बाजरी,ऊस तसेच फळबाग आणि भाजीपाला पिकांसाठी होत आहे.यासोबतच शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात खतांचा वापर, जमिनीची काळजी आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धती याविषयीही मार्गदर्शन केले जात आहे.गोपीनाथ गडावर यावेळी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी नतमस्तक होत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.समाजा तील शेवटच्या घटका पर्यंत विकास पोहोचविण्याचा त्यांचा विचार आजही अनेकांना प्रेरणा देत आहे.त्यांच्या विचारातूनच पर्यावरण संरक्षण,शेतकरी सक्षमीकरण आणि जैविक शेती सारख्या उपक्रमांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गोपीनाथगडावर झालेला हा संकल्प केवळ एक घोषणा नसून,शेती, पर्यावरण आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. जैविक शेतीचा प्रसार आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
जैविक खत संदर्भात
Asclepius agriculture kaij ,Mo.9503920128 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कमलाकर सोनवणे यांनी केले आहे.



